लोकपाल विधेयक हे भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी भारतामध्ये नेमावयाचे लोकपालनामक अधिकारी, त्यांची नेमणूक, त्यांचे कार्यक्षेत्र आणि त्यांची कर्तव्ये यांची निश्चिती करण्यासाठी निर्मिले गेले आहे.
लोकपालाच्या चौकशीची पद्धत, कार्यकक्षा, सुनावणीची पद्धत, लोकपालाचे अधिकार, विशेष न्यायालये, लोकपाल सदस्यांविरुद्धच्या तक्रारी, संपत्ती जाहीर करणे, खोट्या तक्रारीसाठी दंड यासह अन्य किरकोळ बाबीही या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.
व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदा २०१४ – याद्वारे लोकपाल विधेयकामध्ये एखाद्या यंत्रणेतील भ्रष्टाचार, सरकारमधील भ्रष्टाचार किंवा लोकसेवकांनी घडवून आणलेले घोटाळे उघडकीस आणणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. कोणत्याही दबावापासून किंवा धोक्यापासून त्यांना संरक्षण देणारा व्हिसल ब्लोअर संरक्षण कायदाही प्रस्तुत पुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे.
संसदेने मंजूर केलेले हे अधिनियम कसे आहेत? यातील तरतुदी काय आहेत, याची माहिती जनतेला व्हावी म्हणून हे पुस्तक बनवले गेले आहे. प्रस्तुत पुस्तक जनसामान्यांना अत्यंत उपयुक्त ठरेल, हीच अपेक्षा!