स्वयंसेवी संस्था समाजाच्या जवळ असतात. सामाजिक प्रश्न त्यांनी अत्यंत जवळून पाहिलेले असतात व ते कसे हाताळावेत याची त्यांना योग्य जाणीव असते. शासकीय यंत्रणेपेक्षा स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा प्रभावीपणे काम करते. यामुळेच निधीचा स्रोत मोठ्या प्रमाणात या संस्थांकडे वळतो आहे; परंतु निधी संकलनात संस्थांना काही वेळेस तांत्रिक कारणाने अडचणी येतात व हेतू उदात्त असला तरीही तो साध्य होत नाही.
असे होऊ नये आणि स्वयंसेवी संस्था पूर्णपणे सक्षम व्हाव्यात यासाठी योग्य ते मार्गदर्शन या पुस्तकाच्या मार्गातून मिळेल. जेणेकरून स्वयंसेवी संस्थांना निधी उपलब्ध होईल, त्यातून समाजातील वंचित घटकांचा व पर्यायाने महाराष्ट्राचाही आर्थिक व सामाजिक विकास होईल.