आयूष्य बदलवणारे पुस्तक आता
अधिक चांगल्या रूपात
जर तुम्ही ‘नेतृत्वाचे 21 आदर्श सूत्रं’ वाचले नसेल तर तुम्ही एका सर्वकाळ उत्कृष्ट विक्रीच्या यादीत असलेल्या नेतृत्वविषयक पुस्तकाचा लाभ घेतलेला नाही.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्वतज्ज्ञ, वक्ते आणि लेखक म्हणून ओळखले जाणारे जॉन सी. मॅक्सवेल यांनी हे विक्रमी खपाचे पुस्तक लिहिले आहे आणि त्याला अजूनच चांगले, उपयुक्त बनवले आहे :
• नेतृत्वाचे प्रत्येक सूत्र अद्ययावत केले आहे.
• हे सूत्र आता अधिक सखोलपणे स्पष्ट केले आहे.
• नेतृत्वाबद्दलच्या नवीन सतरा गोष्टींचा या आवृत्तीत समावेश आहे.
• नेतृत्वाच्या दोन नवीन सूत्रांची यात ओळख करून दिली आहे.
• मूल्यांकनाच्या नवीन साधनाद्वारा तुम्हाला तुमच्या नेतृत्वातील शक्तिस्थाने व कमतरता यांच्याविषयी माहिती मिळेल.
• तुमच्या प्रगतीसाठी प्रत्येक प्रकरणात ‘अंमलबजावणी’ या भागाचा समावेश आहे.
आपल्या विक्रमी पुस्तकात डॉ. मॅक्सवेल यांनी बदल का केले?
मॅक्सवेल म्हणतात, “पुस्तक हे वाचक व लेखक यांच्यातील संभाषण असते. ‘नेतृत्वाचे 21 आदर्श सूत्र’ लिहून दहा वर्षे झाली आहेत. त्यानंतर मी खूप विकसित झालो आहे. जगभरात मी एक डझन देशांत ही सूत्रं शिकवली आहेत. मी जे काही शिकलो ते तुम्हाला सांगण्याची संधी मला या आवृत्तीमुळे मिळत आहे.”